शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या कृषी विभागावरील गंडांतर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:18 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण म्हणजे दक्षता समितीची बैठक गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून गुणनियंत्रण व विशेष घटक योजनेचे अधिकार शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे गंडांतर थांबवा, अशी मागणी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी खासदार, आमदारांकडे केली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण म्हणजे दक्षता समितीची बैठक गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात पार पडली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेकडील कृषी विभागाकडून गुणनियंत्रणआणि विशेष घटक योजनांच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. विविध योजनांमध्ये शेतकºयांचा सहभाग कमी होत चालला असताना, ज्या ठिकाणी पदाधिकारी असतात, अशा संस्थांच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी चांगली होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा हा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मंत्री, खासदार, आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी केली.वीज कंपनीकडून सेवेच्या बाबतीत नसलेली तत्परता वसुलीत दाखविली जाते आणि कृषी विभागाकडून अनुदानाच्या योजनांबद्दल गाफिलपणाचे दर्शन घडते, अशी टीका करीत दक्षता समितीच्या बैठकीत गुरुवारी जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी दोन्ही विभागांच्या कारभारावर संताप व्यक्त केला.पीक विमा योजनेसाठी शेतकºयांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यामध्ये केवळ ३० टक्के शेतकºयांनी पीक विमा घेतलेला आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये २ टक्के विमा असल्यामुळे शेतकरी विमा भरतात; मात्र द्राक्ष आणि डाळिंबासाठी विमा हप्त्याची रक्कम मोठी असल्यामुळे तसेच शेतकºयांना कमी भरपाई मिळते. यामुळे शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नाही, असे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. यावर अधिकारी शेतकºयांमध्ये जागृती करण्यास कमी पडत असल्याचे सांगत खासदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. द्राक्ष विमा मिळण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाºयांकडून करण्यात आली.दुरुपयोग झाल्यास कारवाईशासनाच्या विविध विभागांकडे काही ठराविकच व्यक्ती माहिती अधिकाराचे अर्ज करून शासकीय कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम करतात. एकच व्यक्ती अनेक अर्ज अनेक विभागांमध्ये करत असेल, तर अशी व्यक्ती अधिकाºयांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना सदाभाऊ खोत यांनी दिल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषद